Russia is waging a disgraceful war on Ukraine.     Stand With Ukraine!

आता तरी देवा मला पावशील (Aata Tari Deva Mala Pavshil) lyrics

  • Artist: Prahlad Shinde (प्रह्लाद भगवानराव शिंदे)
Varhadi
Varhadi
A A

आता तरी देवा मला पावशील (Aata Tari Deva Mala Pavshil)

आता तरी देवा मला पावशील का
सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का
 
पैसा तो अन्यायाचा करी खळबळ
दावी कुणी मजुराला मारुतीचे बळ
न्यायासाठी मदतीला धावशील का
सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का
 
चोरी करून चोर दूर पळतो
संशयाने गरिबाला मार मिळतो
लाच घेती त्यांना आळा घालशील का
सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का
 
दिले निवडून जरी आमुचे गडी
जनता पाठीशी त्यांच्या आहे खडी
भलं आमचं करण्याला सांगशील का
सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का
 
आता तरी देवा मला पावशील का
सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का
 
Thanks!
Submitted by SkribblSkribbl on 2022-09-28
Submitter's comments:

This song is in Varhadi.

 

Comments
Read about music throughout history